1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Gulabrao Patil advises women on self-defense

फक्त लिपस्टिकच नाही तर ही खास वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, मंत्र्यांनी दिले विधान

सध्या महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढत आहे. आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी महिलांनी त्यांच्या पर्समध्ये लिपस्टिक आणि पावडरसह चाकू आणि लाल तिखटाची पूड बाळगावी असा सल्ला दिला आहे.
ते म्हणाले जरी आज आपण महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल बोलत असलो तरीही महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. 

पाटील यांनी या वेळी महिला सक्षमीकरणासाठी सरकारने उचललेल्या पावलांवरही प्रकाश टाकला, ज्यामध्ये एमएसआरटीसी बस भाड्यात 50 टक्के कपात, लाडकी बहीण योजना आणि मुलींसाठी मोफत शिक्षण यांचा समावेश आहे
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील महिलांनी स्वरंक्षणासाठी आपल्या पर्समध्ये लिपस्टिक सह मिरची पावडर आणि चाकू ठेवावा असे म्हटले होते. 

काहीही बदलले नसून परिस्थिती  तशीच आहे. महिलांनी स्वसंरक्षणासाठी अशा वस्तू आपल्या जवळ बाळगावी अशी मी भगिनींना विनंती करतो. 
 
Edited By - Priya Dixit 
पुढील लेख
विमानात अचानक एका महिलेने काढले सर्व कपडे,फ्लाइट अटेंडंटशी गैरवर्तन केले, व्हिडीओ व्हायरल