मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जानेवारी 2019 (08:56 IST)

सवर्णांना आरक्षण मिळाल्याचा आनंदच – सौ. सीमा रामदास आठवले

केंद्रातील सरकार मागील चार वर्षांपासून सवर्णांच्या आरक्षणावर काम करीत आहे. मात्र हा ठराव नेमका संसदेत आता मांडआला आहे, तरी या निर्णयाचा निवडणुकीशी कोणताही संबध नाही, उलट सवर्णांना आरक्षण मिळाल्याचा आनंदच असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी केले आहे.
 
नाशिकमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी सीमा आठवले आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी आपले मत व्यक्त केले आहे.
 
आार्थिक मागासवर्गाला आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा विचार आगोदरपासूनच सुरू होता. या संदर्भातील काम पूर्ण झाले आणि  आता मांडला आहे. हा जो निर्णय आहे याचा संबंध निवडणुकीशी लावता कामा नये असे सीमा आठवले यांनी नमूद केले.  
 
रामदास आठवले यांनी आरक्षणाबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. केंद्रात देखील त्यांनी अनेकदा आरक्षणाचा मुद्या मांडलेला आहे. मराठा आरक्षणावर काही दलित संघटना न्यायालयात गेल्या असल्या तरी मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणतीही अडचण येणार नसल्याचेही आठवले म्हणाल्या आहेत.