शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (08:25 IST)

वरूण सरदेसाई यांच्यावर गुन्हा दाखल झाला का?, मनसेचा सवाल

दहीहंडी उत्सव साजरा केल्याबद्दल आमच्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर पोलिसांची कारवाई केली जाते. गर्दी करू नका असे मुख्यमंत्री दुसऱ्यांना सांगतात, मात्र त्यांच्या पक्षातील लोकांना सांगत नाही. नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? सरदेसाई मुख्यमंत्र्यांचा भाचा आहे म्हणून त्याला सुट मिळते का?असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी मंगळवारी केला करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सवावर निर्बंध लादण्यात आले आहेत.अशावेळी दहीहंडी साजरी करणारे मनसे नेते बाळा नांदगावकरा यांच्यासह मनसेच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काही सवाल केले आहेत.
 
राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही दहीहंडी ठिकठिकाणी साजरी केली.मुख्यमंत्री दुसऱ्यांना सांगतात, मग स्वत:च्याच पक्षातील लोकांना घरी बसायला का सांगत नाहीत? आंदोलन करत असताना शिवसैनिकांना घरी बसायला का सांगितले नाही? वरुण सरदेसाईवर गुन्हा दाखल झाला का? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट देताय का? अशी विचारणा त्यांनी केली.