सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 जुलै 2024 (15:48 IST)

नांदेड येथे ऑटो रिक्षा आणि ट्रकची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

नांदेड येथे रस्ता अपघातात एक ऑटोरिक्षा आणि ट्रकची धडक होऊन तीन जणांचा मृत्यू झाला. तर चार जखमी झाले. हा अपघात महाराष्ट्र -तेलंगणा सीमेजवळ धर्माबाद तालुक्यात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशी आणि शेळ्यांना घेऊन एक ऑटोरिक्षा धर्माबाद कडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकला. या अपघातात आटोरिक्षा चालक, आणि दोन प्रवाशी जागीच ठार झाले. तर चार जण जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रकरणाची पोलिसांनी नोंद केली आहे.  पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. 

या अपघातात ऑटोमधील तीन शेळ्या ठार झाल्या आहे. शनिवारी तेलंगणाहून आठवडे बाजारातून शेळ्या आणल्या होत्या. ऑटोची समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली आणि अपघात घडला. या अपघात तिघांचा मृत्यू झाला. तर 4 जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
 

Edited by - Priya Dixit