बुधवार, 25 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 (21:31 IST)

मुंबईसह 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

rain
देशातून मान्सून माघारीला सुरुवात झाली आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनने आधीच परतीचा प्रवास सुरू केला आहे. मंगळवारी हवामान खात्याने सांगितले की, राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांतून आणि पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे.
 
 मात्र, मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनचा पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील 2 ते 3 दिवस राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली  आहे. 
 
24 ते 26 सप्टेंबर दरम्यान मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
हवामान खात्याने बुधवारी 25 सप्टेंबर  मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

या काळात मुंबई आणि उपनगरात विविध ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, रायगड आणि पुण्यात 25 सप्टेंबरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात रायगड आणि पुणे येथे विविध ठिकाणी अति मुसळधार पाऊस आणि मेघगर्जना, विजांचा कडकडाटा सह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मंगळवारी पहाटे मुंबईत सप्टेंबर महिन्यातील पहिल्या मुसळधार पावसाची नोंद झाली. IMD नुसार, मंगळवारी पहाटे 2.30 ते 4.30 दरम्यान मुंबईत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.
 
कमी दाबाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात हा आठवडाभर पाऊस सुरूच राहणार आहे. ही कमी दाबाची प्रणाली वरच्या दिशेने जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पालघरमध्ये 26 सप्टेंबरला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Edited By - Priya Dixit