सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (10:20 IST)

राज्यात मुसळधार पाऊस

राज्यात मुंबई,ठाणे,पालघर, कोकणासह अनेक भागांत सध्या मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत.तर काही भागांत पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. राज्यातील धरण क्षेत्रातही पावसाचा जोर आहे. मध्य महाराष्ट्र,विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत संततधार पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र येत्या 1 ते 2 दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने वर्तवला आहे.
 
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि संपूर्ण राज्यभर 48 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याच्या अंदानुसार, 17 ऑगस्टला औरंगाबाद,जालना,परभणी, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर 18 ऑगस्टला नंदुरबार,धुळे,औरंगाबाद,नाशिक, जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.