Marathi Biodata Maker

होळी अन रंगोत्सव साजरा करतांना घ्या खबरदारी

मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (15:32 IST)
वीज वितरण यंत्रणांपासून सावधानता बाळगण्याचे महावितरणचे आवाहन
होळी, धुळवड आणि विविध रंगांची उधळण करीत येत असलेल्या रंगपंचमी या सलग सणांच्या मालिकेत संभाव्य वीज अपघात टाळण्यासाठी खबरदारीची आवश्यकता आहे. होळी पेटविताना व रंगांची उधळण करताना वीज वितरण यंत्रणांपासून सावधानता बाळगून सणांचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
सभोवताली वीज वाहिन्या किंवा रोहित्र नाहीत, याची खातरजमा करूनच होळी पेटवावी. अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून अपघाताचा धोका संभवतो. तसेच अनेक ठिकाणी वीज वाहिन्या भूमिगत टाकण्यात आल्या असून या भूमिगत वीज वाहिन्यांपासून दूर अंतरावर होळी पेटवावी. जेणेकरून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील. शक्यतो मोकळ्या जागेत, मैदानावर होळी पेटवावी. विजेचे अपघात प्राणघातक ठरू शकतात, एक चूकही जीवावर बेतू शकते हे लक्षात ठेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी.
रंगोत्सव साजरा करतांना पाण्याचा फवारा वीज वाहिन्यांपर्यंत उडणार नाही याची खबरदारी घ्यावी. रंग भरलेले फुगे परस्परांवर टाकतांना ते वीज वितरण यंत्रणांना लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओल्या शरीराने वीज वितरण यंत्रणांना स्पर्श करणे टाळा. विजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची दक्षता घ्या. घरात होळी खेळतांना वीज मीटर, विजेचे प्लग, वीजतारा व वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा व ओल्या हाताने या वस्तू हाताळणे टाळा. आवश्यक ती खबरदारी घेऊन होळी, धुळवड व रंगपंचमीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
हे लक्षात ठेवा
- वीज वितरण यंत्रणेपासून दूर अंतरावर होळी पेटवा
- वीज वाहिन्या, वितरण रोहित्रांवर पाणी फेकू नका
- ओल्या हाताने वीज वितरण यंत्रणा व उपकरणे हाताळणे टाळा
- वीज वितरण यंत्रणांभोवती पाण्याचा निचरा करू नका

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

राहुरी-शनी शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

'मुक्त संवाद' आयोजित १३ व्या बालनाट्य महोत्सवाची शानदार सांगता; १६० हून अधिक बालकलाकारांचे सादरीकरण

LIVE: राहुरी-शनी शिंगणापूर रेल्वे प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्

नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा येथे भीषण रस्ते अपघातात चालकाचा मृत्यू; पाच जण गंभीर जखमी

१० लाखांच्या बजेटमध्ये सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कार; पेट्रोल आणि CNG मधील टॉप पर्याय

पुढील लेख
Show comments