सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (09:39 IST)

ऑनर किलिंग भावाने केला बहिणीचा गळा दाबून खून

नात्यातील तरुणाशी प्रेम सबंध ठेवत वैदिक पद्धतीने लग्न केलेल्या देवळा येथील युवतीच्या तिच्या भावाने खून केल्याचे उघड झाले आहे. अगोदर गळफास घेवून आत्महत्या असे भासवले गेले मात्र ग्रामीण पोलिसांचा तपास व पोस्ट मार्टेम रिपोर्ट यावरून तिचा मारहाण करून गळा आवळून खून झाल्याचे उघड झाले आहे. गुंतागुंत असलेले हे प्रकरण अखेर पोलिसांनी सोडवले आहे. संशयित आरोपी भावास अटक केली आहे.
 
पोलिसांनी दिलेले सविस्तर वृत्त असे की, दि. ७ डिसेंबर रोजी दहीवड , देवळा येथील रहिवासी निंबा सोनावणे यांची मुलगी प्रियांक राहत्या घरी गळफास घेवून मृत झाल्याचे समोर आले होते. तिने आत्महत्या केली असे प्राथमिक स्वरूपात दिसून आले, त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिच्या अंत्यविधीची तयारी सुरु केली. मात्र ग्रामीण पोलिसांनी जेव्हा तिच्या शरिर पाहिले तेव्ह्या तिच्या तोंडावर हातवार मारहाणीच्या खुणा त्यांना दिसून आल्या होत्या. त्यांनी विचारपूस केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे प्रियांकाचे मृतदेह पोस्ट मार्टेम करिता पाठवला गेला. त्यात अनेक गोष्टीचा खुलासा झाला. प्रियांकाचा खून झाला असून तिचा गळा आवळून तिला ठार केले गेले होते. तर त्या आगोदर तिला मारहाण देखील केल्याचे रिपोर्ट मध्ये नमूद केले होते.
 
पोलिसांनी सखोल चौकशी केली असता तिने तिच्या नात्यातील कळवळ येथील रहिवासी तरुण अमोल आहेर सोबत नाशिक येथे वैदिक पद्धतीने विवाह केला होता हे उघड झाले. तिच्या प्रेमास आणि विवाहास घरातील सर्वांचा प्रखर विरोध होता. पोलिसांनी अमोलची चौकशी केली असता त्याने सर्व कागदपत्रे दाखवली.
 
मग पोलिसांनी तिचे नातेवाईक आणि इतरांची चौकशी सुरु केली तर त्यांच्या आणि तिचा भाऊ रोशन यांच्यात घटनेच्या माहितीची भिन्नता दिसून आली, तेव्हा पोलिसांनी रोशन यास विश्वासात घेत चौकशी केली असता रोशनने त्याचा गुन्हा कबूल केला असून, नात्यात प्रेम आणि विवाह केल्याने समाजात मोठी बदनामी होणार म्हणून प्रियांकाला त्याने मारले होते. दि. ७ डिसेंबर रोजी त्याने घरी कोणी नव्हते तेव्हा तिला मारहाण केली तर तिचे हात पाय बांधून तिचा घरातील साडीने गळा आवळून खून केला, व आत्महत्या भासावी असे चित्र निर्माण केले होते. पोलिसांनी कलम ३०१, २०२ प्रमाणे देवळा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला असून रोशनला ताब्यात घेतले आहे.