मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2016 (14:42 IST)

पार्टीची हाऊस बोट बुडाली तिघे बेपत्ता

बोटीतील प्रवासी पार्टी करण्यासाठी जात असताना मुंबईतील पवईच्या तलावात बोट उलटली आहे. यात बोटीतील आठही जण पाण्यात बुडाले. पवई तलावात  ही बोट उलटली आहे . बुडालेली बोट हाऊस बोट असल्याचं समोर आलं आहे. बोटीतील 8ही जण पाण्यात बुडाले, मात्र त्यापैकी दोघांना स्थानिकांनी वाचवलं. तर तिघे स्वत: पाण्यातूव पोहत वर आले. बुडालेले तिघेजण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध पोलीस आणि अग्नीशमन दलाकडून सुरु आहे. त्यामुळे या तलावातील सुरक्षा पुन्हा धोक्यात असल्याचे समोर आले आहे.