भाजपच्याच नेत्यांना दिलासा कसा काय मिळतो, दिलीप वळसे-पाटील यांचा सवाल
भाजप नेते किरीट सोमय्या यांना हायकोर्टाने अटकपूर्व जामीन देत दिलासा दिला. यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका करायला सुरूवात केली आहे. दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करत भाजपच्याच नेत्यांना दिलासा कसा काय मिळते याबाबत आम्हाला आश्चर्य वाटत असल्याचे म्हणाले.
मागच्या कित्येक वर्षांपासून शरद पवार यांचे नाव दाऊदशी जोडले जाते पण यातून विरोधकांना काहीही मिळाले नाही. दरम्यान आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांचा जामीन मंजूर होतो ही आश्चर्याची बाब आहे. त्यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाल्याने आम्हाला आश्चर्य वाटल्याचे ते म्हणाले.