छ्त्रपती शिवाजींचा 35 फुटी पुतळा कसा काय कोसळला, अजित पवार पाहणीसाठी मालवण पोहोचले
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनतेची माफी मागितली आहे.
अजित पवार हे पुतळ्याची पाहणी साठी सिंधुदुर्गच्या मालवण येथे पोहोचले त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. एवढा मोठा पुतळा कसा कोसळला याची माहिती ते अधिकाऱ्यांकडून घेणार आहे.
वर्षाच्या आत हा पुतळा कोसळ्ल्यावरून विरोधक सरकारला धारेवर घेत आहे. सरकार स्वतःचा बचाव करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने या प्रकरणी सरकारपासून वेगळी भूमिका घेतली आहे.
अजित पवारांनी जनतेची माफी मागताना म्हटले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे हे अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला कठोर शिक्षा दिली जाईल. मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे. आपल्या देवाचा पुतळा कोसळणे हे आपल्या सर्वांसाठी धक्कादायक बाब आहे.
Edited by - Priya Dixit