Ladka Bhau Yojana माझा लाडका भाऊ योजना अर्ज कसे करावे, पात्रता आणि कागदपत्रे याबद्दल संपूर्ण माहिती
लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यानंतर सरकारने लाडका भाऊ योजना आणली आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांना आधार देण्यासाठी सुरु केलेला उपक्रम आहे.
यात शैक्षणिक अर्हतेनुसार राशी विवरण याप्रकारे असेल-
१२ वी पास- ६००० प्रतिमाह
डिप्लोमा - ८००० प्रतिमाह
पदवीधर- १०००० प्रतिमाह
लाडका भाऊ योजनेत कोणाला करता येणार अर्ज
लाभार्थी- सुशिक्षित बेरोजगार युवा
उमेदवार पात्रता-
वय: १८ ते ३५ वर्षे
किमान शैक्षणिक पात्रता: 12वी पास/ITI/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर
महाराष्ट्राचा रहिवासी
आधार नोंदणी
आधार संलग्न बँक खाते
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पोर्टलवर नोंदणी https://edistrictportal.com/rojgar-mahaswayam-cmykpy/
लाडका भाऊ योजनेसाठी लागणार हे कागदपत्रे Ladka Bhau Yojana kagadpatre
Ladka Bhau Yojana Online Apply :महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण तरुणीसाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना ची घोषणा केली आहे त्याचे नाव मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे, या योजनेचे नाव अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे ठेवले आहेत तरी या योजनेद्वारे राज्यातील सर्व सुशिक्षित तरुण-तरुणीसाठी कार्य प्रशिक्षण सहा महिने त्यांना दिले जाईल व त्यांना योग्य याच्या मोबदला पण दिला जाईल|
लाडका भाऊ योजनेमध्ये योग्य उमेदवाराला योग्य ते काम देऊ व त्याचे कौशल्य देऊन त्याच्या आत्मविश्वास व स्वावलंबन केले जाईल. सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.
या कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) चा कालावधी 6 महिने असेल आणि या कालावधीसाठी सुशिक्षित तरुण-तरुणीना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. हे विद्यावेतन लाभार्थी तरुणाच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.
माझा लाडका भाऊ योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
आधार कार्ड
बँकेचे पासबुक आधार कार्ड लिंक
रहिवास प्रमाणपत्र
महास्वयम या पोर्टलवर नोंदणी करून तेथील एम्प्लॉयमेंट कार्ड ची प्रत
लाडका भाऊ योजनेच्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बारावी पास, आयटीआय, डिप्लोमा डिग्री व पदव्युत्तर याचे सर्व सर्टिफिकेट असावी
याचबरोबर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पासपोर्ट आकाराचे फोटो आदी आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक 18001208040 यावर संपर्क साधावा.