1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

महापालिकेत मतदान कसे करावे

नाशिक महानगरपालिकेसाठी मतदान करावयाची पध्दती खालील प्रमाणे असेल...चार सदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभागात एका मतदाराने चार मते देणे आवश्यक आहे...तीन सदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभागात एका मतदाराने तीन मते देणे आवश्यक आहे..प्रत्येक प्रभागातील सर्व जागांवरील एकूण उमेदवारांच्या संख्येनुसार आवश्यक असलेल्या बॅलेट युनिटवर अनुक्रमे ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ जागेची मतपत्रिका असेल.
मतपत्रिकांचा रंग खालील प्रमाणे असेल...
‘अ’ जागेसाठी पांढरा रंग
‘ब’ जागेसाठी फिका गुलाबी
‘क’ जागेसाठी फिका पिवळा 
‘ड’ जागेसाठी फिका निळा
 
मतपत्रिकेवर उमेदवाराचे नाव व  चिन्ह असेल.मतदाराने मतदान करण्याची प्रक्रीया खालील प्रमाणे राहील...
‘अ’ जागे साठीच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या (योग्य) उमेदवारासमोरील बटन दाबल्या नंतर लाल दिवा लागल्या नंतर ‘अ’ जागेसाठी मतदान प्रक्रीया पूर्ण होईल...त्यानंतर ‘ब’ जागेसाठीच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या(योग्य) उमेदवारासमोरील बटन दाबल्यानंतर लाल दिवा लागल्यावर ‘ब’ जागेसाठी मतदान प्रक्रीया पूर्ण होईल...याप्रमाणे उर्वरीत ‘क’ व  ‘ड’ जागेसाठी मतदान प्रक्रीया पूर्ण होईल..पूर्ण मते दिल्यानंतर बझर (मोठा बिप) वाजेल, याचा अर्थ तुम्ही चारही जागांसाठी मतदान केलेले असून तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजावे.तसेच एखाद्या मतदारास एखाद्या विशिष्ट जागेसाठीच्या उमेदवारापैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर त्यास अशा मतपत्रिकेवर सर्वात शेवटी असलेले NOTA  बटन दाबता येईल.