उपमुख्यमंत्र्यांचा पीए असल्याचे सांगून पती पत्नीने केली 18 जणांची लाखोंची फसवणूक
उपमुख्यमंत्र्यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) असल्याचे भासवून 18 जणांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. यामध्ये पती-पत्नी दोघेही सहभागी आहेत. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जळगावमधील एका जोडप्याविरुद्ध 18 जणांना 55 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शनिवारी एका पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, जळगावमधील पाचोरा येथील रहिवासी हितेश रमेश संघवी आणि त्यांची पत्नी अर्पिता संघवी यांनी लोकांना सरकारी नोकऱ्या, निविदा, म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण) मधील घरे इत्यादींचे आश्वासन दिले होते.
आरोपींची स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीए असल्याचे सांगितले आणि मंत्रालयात त्यांचे कार्यालय आहे असे सांगितले .दुग्धव्यवसायी हर्षल बारी हे त्यांच्या संपर्कात आले आणि संघवी यांनी बारी कडून बारीच्या पत्नीला रेल्वेत नौकरी मिळवून देण्यासाठी 7 लाख रुपये आणि म्हाडाच्या फ्लॅटसाठी 10 लाख रुपये दिले.
'आरोपी लोकांना फसवण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि नियुक्तीपत्रे दाखवायचे.बारीने नोव्हेंबर 2024 ते 8 ऑगस्ट 2025 दरम्यान त्यांना 13.38 लाख रुपये दिले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बारीने गुरुवारी तक्रार दाखल केली.'
पोलिस पथकाने संघवी दाम्पत्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीसह संबंधित कलमांखाली दोघां विरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Edited By - Priya Dixit