रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (12:57 IST)

पती मित्रांकडून बायकोवर करवायचा बलात्कार, 3 वर्षांपासून सुरु होता प्रकार

नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे ज्यात पतीने वेगवेगळ्या मित्रांना घरी बोलवून आपल्या डोळ्यांसमोर पत्नीवर बलात्कार करायला लावल्याची बाब समोर आली आहे. गेली तीन वर्ष हा प्रकार सुरु होता. या प्रकरणी बारामती पोलिसांनी विकृत पतीसह पाच जणांना अटक केली आहे तर अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
 
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीजवळ एका गावातील तरुणाचं पीडित महिलेशी 2016 मध्ये विवाह झाला. लग्नानंतर वर्षभरातच पती-पत्नीमध्ये लैंगिक समस्या निर्माण झाली, पती समलैंगिक असल्याने त्याचं आकर्षण दुसरीकडे वाढू लागलं आणि तो आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नव्हता. सुरुवातीचे काही दिवस पत्नीने याकडे दुर्लक्ष केलं. पण कालांतराने त्यांच्यातील लैंगिक समस्या वाढत गेली.
 
नंतर आरोपी पतीने पत्नीच्या नावाने आपल्या मित्रांना मेसेज करुन घरी बोलावलं. मित्र घरी आल्यानंतर विकृत पतीने मित्राला पत्नीवर बलात्कार करण्यास सांगितलं. मित्र पत्नीवर बलात्कार करत असताना पती आनंदी होतं होता. 
 
2017 ते 2021 सलग तीन वर्ष विकृत पतीने अशाच प्रकारे आपल्या वेगवेगळ्या मित्रांकडून पत्नीवर बलात्कार करवला. पत्नीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पती वेगवेगळ्या मित्राला आमंत्रित करायचा.
 
पत्नीला या प्रकाराला विरोध केल्याने वाद व्हायचे. एका क्षणाला पत्नीने घर सोडून जाण्याचा निर्णय घेत्यावर पतीने माफी मागितली. नंतर तोच प्रकार सुरु ठेवला. आरोपी पत्नीला आपल्या मित्रांसोबत शाररिक संबंध ठेवायला भाग पाडून या प्रक्रियेचा आनंद घेत स्वतःला उत्तेजित करायचा. 
 
अखरे पत्नीने कंटाळून माहेरी जात आपल्या आईला हा प्रकार सांगितला, अशी माहिती बारामती पोलीसांनी दिली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत विकृत पतीसह पाच मित्रांना अटक केली आहे.