रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (21:40 IST)

चाळीस आमदारांसोबत मीही राजीनामा देतो, सर्वांनी निवडणुकीला सामोरे जाऊ -आदित्य ठाकरें

मविआ सरकार असते तर वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प  महाराष्ट्रात आणलाच असता, असं वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तळेगावात केलं. चाळीस आमदारांसोबत मीही राजीनामा देतो, सर्वांनी निवडणुकीला सामोरे जाऊ, असं आव्हानही शिंदे गटातील आमदरांना आदित्य ठाकरेंनी दिले.
 
आज पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे शिवसेनेने आंदोलन केले. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. यावेळी हजारो शिवसैनिक एकत्र येत त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.
 
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही, केंद्राला किंवा गुजरातला दोष देत नाही, हा दोष खोके सरकारचा आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा गुजरातने घेतला. सध्या राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत ऩाही.