1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (19:42 IST)

मला मुख्यमंत्री होण्याची अजिबात घाई नाही : अशोक चव्हाण

I am in no hurry to become Chief Minister: Ashok Chavan
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बांधकाम मंत्रीअशोक चव्हाण भोकरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात मला मुख्यमंत्री होण्याची अजिबात घाई नाही, असं वक्तव्य केलं. “महाविकास आघाडीचं सरकार सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. आपली सत्ता आली म्हणून सर्व कामं होत आहेत. त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची अजिबात घाई नाही आहे. उद्धव ठाकरे राज्याच्या प्रमुख आहेत. त्यांच्या सोबत मनापासून साथ देत आहोत. त्यामुळे मला कुठेही या महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण करायची नाही आहे. काही लोक बिघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चिंता करु नका, तसं काही होणार नाही. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शरद पवार, अजित पवार आम्ही सर्व प्रमाणिकपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहू आणि महाविकास आघाडी सरकार पुढील पाच वर्ष टीकेल असा विश्वास आहे,” असं अशोक चव्हाण म्हणाले.