केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामध्ये काही लोकांचा बळी जातो त्यातला मी एक
केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात काही लोकांचा बळी जात आहे.यापैकी मी एक आहे असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.प्रताप सरनाईक म्हणाले, “मी सुरवातीपासून सांगितलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामध्ये काही लोकांचा बळी जातो त्यातला मी एक आहे. मात्र मला ईडीच्या कुठल्याही अधिकाऱ्याकडून त्रास झाला नाही. ते त्यांचं काम करत आहेत.”प्रताप सरनाईक सध्या ईडीच्या कारवाईला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमिवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक,त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.त्यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर देखील ईडीनं छापा टाकला होता.बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीकडून ही चौकशी करण्यात आली आहे.