1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 27 एप्रिल 2021 (16:22 IST)

माझा नरेंद्र मोदींवर पूर्ण विश्वास आहे, मद्रास कोर्टाने केलेली टिप्पणी ते गांभीर्याने घेतील

माझा नरेंद्र मोदींवर पूर्ण विश्वास आहे. मोदींनी ज्या पद्धतीने संकटाशी लढण्यासाठी पकड घेतली आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेसाबोत लढण्यासाठी त्यांनी धोरण आखलं आहे ते पाहता मद्रास कोर्टाने केलेली टिप्पणी ते गांभीर्याने घेतील असा मला विश्वास आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत आहे का असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “भारताचा अपमान हा राजकारणाचा विषय नाही. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान होत असेल तर आपण सर्वांनी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून देशाच्या पंतप्रधानांसोबत उभं राहिलं पाहिजे. जी निती मोदी आखतील त्याच्यासाठी आम्ही उभे राहू असा विश्वास मला द्यायचा आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय मंचावर देशाचा नेता किंवा सरकार यांचा अपमान होणं ठीक नाही. परदेशात प्रसारमाध्यमं, सोशल मीडियावर चित्र रंगवलं जात असून त्यामुळे देशातील व्यवहार, सामाजिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो”.
 
भारतीय अर्थव्यवस्थेला संपवण्याचं हे मोठं षडयंत्रही असू शकतं अशी शंका व्यक्त करताना आपण सर्वांनी एकत्रित लढलं पाहिजे असं आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केलं.