शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 फेब्रुवारी 2017 (17:06 IST)

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राजीनामा

i-have-kept-resignation-ready-pankaja-munde
परळीत झालेला पराभव स्वीकारत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर पंकजा मुंडे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच जिल्हा परिषद गटांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंशी पंकजा मुंडेंची टक्कर होती.
 
काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही पंकजा मुंडेंवर धनंजय मुंडेंनी सरशी करत परळी नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला होता. त्यामुळे पंकजांनी पराभव स्विकारत राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सगळे काही करुनही जनतेने असा कौल का दिला, त्याचे विश्‍लेषण आत्ता करता येणार नाही. मात्र पराभव स्वीकारुन मी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवणार असल्याचे पंकजा मुंडेंनी जाहीर केले आहे.