शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (20:59 IST)

जर कोणी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येणार असेल, तर त्यांचे स्वागतच आहे : सुळे

supriya sule
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडें या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली.
 
यावेळी त्यांनी महागाई आणि पीएफआयवरील बंदीवरून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. दरम्यान, यावेळी पत्रकारांनी त्यांना पंकजा मुंडेंच्या भाजपा सोडण्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, “प्रत्येकाने आपला निर्णय घ्यावा. जर कोणी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येणार असेल, तर त्यांचे स्वागतच आहे.”

Edited by : Ratnadeep Ranshoor