संबंधित माहिती
- अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर, एकाच दिवशी चक्क 359 कोरोना पॉझिटिव्ह
- केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य
- कोविड चाचणी फिरत्या प्रयोगशाळा व्हॅनचे लोकार्पण
- हा तर राज्य सरकारच्या सूड भावनेने वागण्याच्या वर्तणुकीचा परमोच्च बिंदू : दरेकर
- चेहऱ्यावरील हे सामान्य दिसणारे चिन्हे आजारपणाचे लक्षण असू शकतात
भाजपाला जर इतकं वाईट वाटत होतं तर त्यांचं विमान द्यायला हवं होतं : संजय राउत
राज्यपालांना ठाकरे सरकारने विमान प्रवास नाकारला यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. यामध्ये भाजपाचा काय संबंध आहे. भाजपाला जर इतकं वाईट वाटत होतं तर त्यांचं विमान द्यायला हवं होतं. भाजपाकडे खूप व्यवसायिक विमानं आहेत. कोश्यारी भाजपाचे नेते आहेत. अलीकडे राजभवनात राज्यापेक्षा भाजपाची कामंच जास्त चालतात अशी लोकांची भावना आहे. राज्यपालांचा अपमान व्हावा अशाप्रकारचं कोणतंही काम राज्य सरकार किंवा राज्याचे मुख्यमंत्री करणार नाहीत आणि त्यानी केलंही नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
राज्यापालांना खासगी कामासाठी सरकारी यंत्रणा वापरायची असेल तर त्यासंदर्भात काही नियम आहेत. त्या नियमांचं सरकाने उल्लंघन केलं असतं तर आक्षेप आला असता. अनेक राज्यांमध्ये असे प्रकार घडले आहेत. तुम्ही जेव्हा वैयक्तिक कामासाठी आपल्या राज्यात जाता तेव्हा विमान वापरण्यासंदर्भात गृहखात्याचे काही निर्देश आहेत. त्या निर्देशांचं पालन राज्य सरकारने केलं आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
