सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (16:50 IST)

केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी आता कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना उद्धव ठाकरे सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, केरळहून रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी हा आदेश बंधनकारक आहे. 
 
प्रवाशांना हवाई मार्गाने महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी ७२ तास  आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागणार आहे. विमानात बसण्याची परवानगी देण्यापूर्वी प्रवाशांचे कोरोना चाचणी अहवाल तपासावेत, अशी विमानतळ प्राधिकरणाला विनंती करण्यात आली आहे. तर, रेल्वे मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना ९६ तास आधीचा आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट असणे बंधनकारक करण्यात आले आहे.