मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (07:52 IST)

काय म्हणता, मुंबईतील रेल्वे स्थानकांत प्रवाशांना सलूनची सेवा मिळणार

मुंबईतील रेल्वे स्थानकांत प्रवाशांना आता सलूनचीही सेवा मिळणार आहे. मुंबई सेंट्रलसह सहा रेल्वे स्थानकात एसी सलून सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी ही सुविधा सुरु होणार आहे. रेल्वे स्थानकातील प्रवासी वर्दळीला अडचण ठरणार नाही, अशा ठिकाणी हे सलून उभारण्यात येणार आहेत. अंधेरी रेल्वे स्थानकात दोन आणि मुंबई सेंट्रल, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली आणि सुरत या रेल्वे स्थानकांत प्रत्येकी एक अशी सलून उभारण्यात येणार आहेत. 
 
सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत हे सलून सुरु राहाणार आहेत. या सलूनमध्ये डोक्याची मालिश, चेहऱ्याची मालिश यांसह सामान्य केशकर्तनालयातील सर्व सुविधा प्रवाशांना माफक दरात उपलब्ध करून देण्यात येतील. पश्चिम रेल्वेकडून ही सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.