मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (09:52 IST)

International Space Station ची आठ दिवसांची सफर करणार 3 प्रवाशी

वॉशिंग्टन- अमेरिकेतील तीन प्रवाशी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाची आठ दिवसांची सफर करणार आहे. एका खासगी कंपनीने आयोजित केलेल्या सफरचा मजा घेण्यासाठी पाच कोटी डॉलर खर्च करणार आहेत. Axiom कंपनीने SpaceX रॉकेटद्वारे प्रवास आयोजित केला आहे.
 
यात टूरमध्ये क्रू मेंबर्सव्यतिरिक्त इस्रायलचे एक फायटर पायलट ऐतान स्टीबी, अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील एक उद्योजक लॅरी कोनर आणि कॅनडामधील एक गुंतवणूकदार मार्क पॅथी अशा तीन व्यक्ती पर्यटक म्हणून प्रवास करणार आहेत. 
 
लॅरी कोनर हे अमेरिकेतले तंत्रज्ञान क्षेत्रातले उद्योजक आहेत. मार्क पॅथी मावरिक कॉर्पचे सीईओ आणि चेअरमन आहेत. तर ऐतान स्टीबी हे अंतराळात जाणारे दुसरे इस्रायली नागरिक ठरणार असून ते व्हायटल कॅपिटल फंडचे संस्थापक आहे. ते फायटर पायलटही होते. 
 
खासगी अंतराळयानातून केली गेलेली ही पहिली अंतराळमोहीम असेल. AX1 ही मोहीम नासातर्फे एका व्यावसायिक कराराचा भाग म्हणून आयोजित केली जात आहे.