सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (12:42 IST)

पाकिस्तान मध्ये दिसला UFO, सोशल मीडियावर ट्रोल

पाकिस्तानच्या एका पायलटनं उड्डाणादरम्यान एक UFO बघितल्याचा दावा केला होता. त्याला आकाशात एक चमकदार युएफओ दिसल्याचं त्यानं म्हटलं. सरकारी विमान कंपनीच्या वैमानिकानं केलेल्या या दाव्याची मात्र सोशल मीडियावर खिल्ली उडत आहे. 
 
व्हिडिओ व्हायरल झाल्यास पाकिस्तानात यावर चर्चा सुरु झाली आहे. काही लोक इतके घाबरले आहेत की याला एलियन म्हणत एलियंस अटॅक होण्याची भीती जाहीर करत आहे. 
 
PIA च्या पायलटने उड्डाणादरम्यान आकाशात UFO बघून आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केले. हे वृत्त पसरताच सोशल मीडियावर मात्र पाकिस्तानला ट्रोल करण्यास सुरुवात झाली.
 
या प्रकरणावर पाकिस्तान एयरलाइंसचे म्हणणे आहे की आकाशात ती चमकणारी वस्तू काय होती याची पुष्टी होऊ शकली नाही.