बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (12:35 IST)

“आज जर बाळासाहेब असते, तर... मुकेश खन्ना यांचा व्हिडीओ चर्चेत

सर्वांच्या आवडत्या शक्तिमान म्हणजे मुकेश खन्ना यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा हा व्डिडिओ चर्चेत आला आहे. यात त्यांनी बाळासाहेबचं तोंड खोळून कौतुक केलं आहे. 
 
त्यांनी म्हटलं की मी लहानपणापासून त्यांना बघून मोठा झालो आहे आणि आयुष्यात त्यांना एकदाच भेटलो पण त्यांच्या निर्णय क्षमतेवर कुणीही बोट ठेवू शकत नव्हतं अशी त्यांची महिमा होती. 
 
खन्ना म्हणाले की त्यांचं मुंबईवरील नियंत्रण ठेवण्याना स्टाईल मी स्वत: बघितला असून त्यांचा सहभाग असलेल्या गोष्टीत लोक प्रश्न विचारत नव्हते आणि त्यांना फॉलो करायचे अशी त्यांची ताकद होती. त्यांनी मुंबई बंद अशी घोषणा केल्यावर दुकानदार स्वत: दुकानं बंद करायचे. 
 
तसेच त्यांनी आयुष्यात कधीही पदाची मागणी किंवा इच्छा बाळगली नाही. त्यांच्यामध्ये कोणतीही समस्या सोडवण्याची ताकद होती. आणि त्याहून जास्त म्हणजे त्यांची मनाला पटणारी सर्वात जास्त चांगली गोष्ट म्हणजे गर्वाने सांगा की मी हिंदू आहे. आपण हिंदू असूनही आज आपल्याला सांगताना लाज वाटते. 
 
तसेच त्यांनी म्हटले की आज बाळासाहेब जिवंत असते, तर मुंबईत अशा घटना घडल्या नसत्या, अशी परिस्थिती उद्भवली नसती.
 
खन्ना म्हणाले, मुंबई बाळासाहेंना सर्वात जास्त मिस करत आहे. बाळासाहेब जर जिवंत असते तर मुंबई आज वेगळी असती.