1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (12:28 IST)

Viral Video शरद पवार म्हणतायतं, आयुष्यात पहिल्यांदा मंत्रालय परिसरात पाणी तुंबलेलं पाहतोय

Sharad Pawar Viral Video of Mumbai Rain
मुंबईत पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे मंत्रालयासमोरही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या पाण्यातून मार्ग काढत घरी जाताना आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढं पाणी पाहतोय, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबईत प्रचंड पाऊस कोसळल्याने मंत्रालयासमोरही पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. मंत्रालयासमोरील तुंबलेलं पाणी पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं. 
 
बुधवारी मंत्रालयासमोरी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली असून घरी जाताना सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून मुंबईतील पावसाचं लाइव्ह सुरू केलं. यावेळी मंत्रालयासमोर प्रचंड पाणी साचले होते. या व्हिडिओत मंत्रालयासमोर आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढं पाणी पाहतोय, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली.