नागरिकांनी अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे : मुख्यमंत्री
मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. मुंबई महापालिकेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. जोरदार पाऊस कोसळत असून पावसाने मुंबईला झोडपले. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे,आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत.
मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून, कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.