बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 25 जुलै 2020 (14:50 IST)

सैफ आणि करीनाने घेतला घर सोडण्याचा निर्णय, हे आहे कारण...

बॉलिवूडमधील कायम चर्चिल्या जाणाऱ्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता सैफ अली खान (Actor Saif Ali Khan)आणि करीना कपूर खान(Actress Karina Kapoor Khan). चित्रपट किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येणारी ही जोडी सध्या त्यांच्या घरामुळे चर्चेत येत आहे. लवकरच हे दोघं त्यांच्या कुटुंबासोबत राहतं घर सोडून जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एका मुलाखतीत सैफने याविषयी भाष्यदेखील केलं आहे.
 
सध्या लॉकडाउनचा काळ असल्यामुळे शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र या काळतही काही वेळा सैफ आणि करीना घरातून बाहेर पडताना पाहायला मिळाले. यावरुन अनेकांनी त्यांना ट्रोलदेखील केलं. मात्र सैफने घराबाहेर पडण्याचं कारणं सांगितलं आहे.
 
सैफ आणि करीना लवकरच त्यांचं राहतं घर सोडून कुटुंबासमवेत नव्या घरात शिफ्ट होणार आहेत. त्यामुळे सध्या या नव्या घरातील कामकाज कसं सुरु आहे हे पाहण्यासाठी त्यांना नव्या घरी सतत जावं लागत आहे.
 
सैफ आणि करीनाने ते सध्या राहत असलेल्या घराच्याच समोर एक नवीन घर घेतलं आहे. या घरात ते लवकर शिफ्ट होणार आहे. परंतु, सध्या या घराचं काम सुरु आहे. ते काम संपल्यावर सैफ त्याच्या कुटुंबासोबत तिकडे शिफ्ट होणार आहे. तसंच सैफचं सध्याचं घर तो भाडेतत्वावर देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
 
दरम्यान, सैफ नुकताच ‘दिल बेचारा’ या चित्रपटात झळकला आहे. या चित्रपटात तो कॅमिओ रोलमध्ये दिसला असून त्याने अभिमन्यू वीर ही भूमिका साकारली आहे. डिस्नी प्लस हॉटस्टॉरवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.