मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 मार्च 2020 (09:36 IST)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ३ मे रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. याची दखल घेऊन आयोगाने या दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घोषित केला आहे.