1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified शनिवार, 21 मार्च 2020 (09:01 IST)

कान्स फिल्म फेस्टिवल कोरोनामुळे पुढे ढकलला

जगातील सर्वात मोठा फिल्म फेस्टिवल्सपैकी एक लोकप्रिय फेस्टिवल असलेला कान्स फिल्म फेस्टिवल कोरोनामुळे हे फिल्म फेस्टिवल पुढे ढकलण्यात आलं आहे. ७३ वे कान्स फिल्म फेस्टिवल हे १२ मे ते २३ मे या काळात आयोजित करण्यात आलं होतं. 
 
आयोजक आता या फ्रेंच रिवेरा फेस्टिवलला जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरूवातीला आयोजित करतील. कान्स फिल्म फेस्टिवलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून १९ मार्च रोजी याबाबत ट्वीट करण्यात आलं आहे. त्यात लिहिलं आहे की, हेल्थ क्रायसेस आणि फ्रान्स आणि जगभरात सुरू असलेल्या या परिस्थितीमुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.