Maharashtra Marathi Breaking News Live Today: मिठी नदी स्वच्छता घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. ईडीने बीएमसी कंत्राटदारांच्या जागेवर छापे टाकले आहेत आणि 47 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.मुंबई विभागीय कार्यालयाने 31 जुलै रोजी मुंबईतील 8 ठिकाणी छापे टाकले.'राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते
मुंबईतील अंधेरी परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने अॅक्टिव्हा (स्कूटर) ला धडक दिली. या अपघातात अॅक्टिव्हावर बसलेल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तिचा पती गंभीर जखमी झाला.सविस्तर वाचा..
मुंबईत पहिल्यांदाच एक अनोखा प्रकार समोर आला आहे. कबुतरांना खायला घालणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सदर घटना माहीम परिसरातली आहे. एलजी रोडवर एका व्यक्तीला त्याच्या कारमधून कबुतरांना खाऊ घालताना दिसल.सविस्तर वाचा..
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखचा सत्कार केला आणि तिला 3 कोटी रुपयांचे रोख बक्षीस दिले. 19 वर्षीय दिव्या 28 जुलै रोजी महिला विश्वचषक विजेतेपद जिंकणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली. तिने अंतिम टाय-ब्रेकरमध्ये देशबांधव कोनेरू हम्पीला हरवून जेतेपद जिंकले आणि ग्रँडमास्टरही बनली.सविस्तर वाचा..
पुण्यातील रस्त्यांची वाईट अवस्था पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरत आहे. पुण्यातील औंध भागात एका वृद्धाची स्कूटर खड्ड्यात अडकून खाली पडली आणि ते वृद्ध पडले आणि त्यांना मागून येणाऱ्या कार ने चिरडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. त्यात गाडीचे पुढचे चाक वृद्धाच्या डोक्यावरून गेल्याचे दिसून येते. यामुळे त्याचा मृत्यू झाला.सविस्तर वाचा..
मिठी नदी स्वच्छता घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. ईडीने बीएमसी कंत्राटदारांच्या जागेवर छापे टाकले आहेत आणि 47 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.मुंबई विभागीय कार्यालयाने 31 जुलै रोजी मुंबईतील 8 ठिकाणी छापे टाकले.सविस्तर वाचा..