मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By

गुढी पाडव्याला कडुलिंबाचं पान खाण्यामागील शास्त्र

हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे. कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. पण कडुलिंब खाण्यामागे काय कारण आहे जाणून घ्या:
 
होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते. या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी-पडशांसारखे विकार फोफावण्याची शक्यता असते. अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने करतात.
 
कडुलिंबाचे औषधी गुणधर्म
 
कडुलिंबातील गुणधर्मांमुळे अंगावर उठणारी खाज व इतर त्वचेसंबंधी विकार व जंतूसंसर्गांपासून बचाव होतो.
 
यातील प्रोटीन घटकांमुळे कर्करोगापासून बचाव होतो.
 
अपचन, पित्त, गॅस या सारख्या समस्या दूर होतात.
 
रक्तातील साखर व इन्सुलिनचे प्रमाण राखण्यास मदत होते अर्थात मधुमेहासाठी याचे सेवन योग्य आहे.
 
कडुलिंबाचे सेवन केल्याने केस काळे राहण्यास मदत मिळते.
 
रक्त शुद्धीसाठी हे उपयुक्त आहे.
 
कफ आणि पित्ताच्या आजारावर अत्यंत गुणकारी आहे.
 
तसेच वर्षभर कडुलिंब खाणे शक्य नसल्यास केवळ गुढीपाडव्यापासून दोन महिने तरी याचे नियमित सेवन केले तरी वर्षभर निरोगी राहण्यास मदत मिळते.