रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 एप्रिल 2021 (12:20 IST)

आलं नवं वर्ष, आली नवी बेला,

आलं नवं वर्ष, आली नवी बेला,
उभारून गुढी, हर्ष मनी झाला,
दारी लावा मंगल तोरण, रांगोळी रेखाटा,
वर्ष नवे येईल, घेऊन नवी दिशा अन वाटा,
नका होऊ हिरमुसले, सोडू नका आशा,
संकटे जातील दूर गुंडाळून आपुला गाशा,
नवं वर्षात करा नवनवीन संकल्प,
माणूसकी न वागा, त्यास न विकल्प!
.....अश्विनी थत्ते