1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Modified मंगळवार, 13 एप्रिल 2021 (06:14 IST)

Gudi Padwa Wishes In Marathi गुढी पाडवा शुभेच्छा

नवीन पल्लवी वृषलतांची, 
नवीन आशा नववर्षाची, 
चंद्रकोरही नवीन दिसते, 
नवीन घडी ही आनंदाची, 
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. 
 
नवी सकाळ, 
नवी उमेद, 
नवे संकल्प, 
नवा आनंद..
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला 
गुडी पाडव्याच्या शुभेच्छा
 
जुन्या गोष्टी मागे सोडून, 
स्वागत करूया नववर्षाचे, 
प्रगतीने आणि उत्साहाने भरलेले असो 
तुमचे नववर्ष हे येणारे 
 
नव्या संकल्पांनी करूया 
नववर्षाचा शुभारंभ, 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. 
 
नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..
सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..
हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी
 
रेशमी गुढी, 
कडुनिंबाचं पान, 
हे वर्ष तुम्हा आम्हा सगळ्यांना जावो छान, 
आमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला नववर्षानिमित्त सदिच्छा

नव्या वर्षात होऊ दे 
मनाला नव्या विचारांचा स्पर्श, 
नवे वर्ष मग आणेल 
आयुष्यात नवा हर्ष..
नववर्षाभिनंदन
 
सुख-दुखाप्रमाणेच गुढीतही आहे कडू-गोड चवीचा मेळ..
तसाच आहे जीवनाचा हा खेळ...
पुन्हा घेऊ नव्या ध्यास 
आणि सुरूवात करू या नवीन वर्षाला खास.