Aam Panna Recipe कैरीचे पन्हे
साहित्य:
एक मोठी कैरी, २ कप साखर, १ लहान चमचा वेलची पूड, चिमूटभर केशर
कृती:
एक मोठी कैरी कूकरमध्ये शिजवून घ्या. थंड झाल्यावर कैरीचं साल काढून गर वेगळा करुन घ्या. गर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. त्यात पाणी व साखर मिसळून घोळून घ्या. केशर व वेलची पूड घाला. थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. गार सर्व्ह करा. आवडीप्रमाणे सर्व्ह करताना किंचीत मीठ घालू शकता. साखर आवडीप्रमाणे कमी-जास्त घातला येते.