रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Modified: शनिवार, 10 एप्रिल 2021 (11:26 IST)

श्रीखंड बनवा झटपट सोप्या पद्धतीने

साहित्य: 
ताजं दही 1 किलो, 
साखर 1 किलो, 
थोडसं केशरी रंग किंवा दुधात भिजवलेल्या केशराच्या काड्या
वेलची पूड अर्धा चमचा, 
अर्धा चमचा जायफळ पूड, 
चारोळी आणि इतर ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे
 
कृती: दही स्वच्छ पातळ कापडात लटकवून ठेवा. त्यातील पाणी निघून जाईल तोपर्यंत लटकवून ठेवा. (4 ते 5 तास). कारण जितकं लटकवून ठेवाला तितकं श्रीखंड घट्ट तयार होतं.
नंतर दही एका भांड्यात काढावं. त्यात साखर मिसळावी.
आता दही पुरणयंत्रातून फिरवून घ्या. काही लोकं चाळणी देखील वापरतात. काही भांड्याला फडकं बाधून देखील फेटतात.
आता त्यात वेलची पूड, केशर, केशरी रंग मिसळा. एकजीव करुन फ्रिजमध्ये ठेवून द्या.
थंड झाल्यावर वरुन आवडीप्रमाणे सुके मेवे घालून सर्व्ह करा.