सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified शनिवार, 26 डिसेंबर 2020 (17:10 IST)

हिवाळ्यात बनवा निरोगी आणि चविष्ट मटार शोरबा

हिवाळ्यात गरमागरम सूप पिण्याचे बरेच फायदे आहेत हे पिण्याची मजाच काही और आहे. या मुळे थंडी पासून बचाव होतो आणि चव देखील चांगली लागते. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत हिरव्या मटारचा शोरबा बनविण्याची रेसिपी. जे आरोग्यवर्धक असण्यासह बनवायला सहज आणि सोपे आहे चला तर मग जाणून घेऊ या साहित्य आणि कृती.
 
साहित्य- 
 2 कप हिरवी मटार (उकडलेले), 2 कप पालक (उकडलेला ), 1 कांदा बारीक चिरलेला,1 लहान तुकडा आलं, 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या, 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 तेजपान, 1 /2 लहान चमचा जिरे, 1 वेलची, 1 लहान तुकडा दालचिनी, तेल गरजेपुरते,मीठ चवीप्रमाणे,पाणी गरजेनुसार, 1 मोठा चमचा क्रीम.    

कृती  - 
सर्वप्रथम मिक्सरमध्ये लसूण,आलं आणि हिरव्या मिरच्या टाकून पेस्ट बनवा. मटार आणि पालकाला वाटून प्युरी बनवा. पॅन मध्ये तेल गरम करून जिरे,वेलची,दालचिनी आणि तेजपत्ता मध्यम आंचेवर भाजा. या मध्ये कांदा, आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. मटार आणि पालकाची प्युरी टाकून 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्या. या मध्ये मीठ आणि पाणी घालून 2 ते 4 मिनिटे उकळवून घ्या. ह्याला सर्व्हिंग बाउल मध्ये काढून वरून क्रीम घाला. गरमागरम हिरव्या मटारचा शोरबा खाण्यासाठी तयार.