रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 28 डिसेंबर 2019 (15:54 IST)

चविष्ट खान्देशी उब्जे

साहित्य 
दीड वाटी तांदुळाची चुरी, अर्धा वाटी चणा डाळ, अर्धा वाटी शेंगदाणे, लिंबू, 4-5 हिरव्या मिरच्या, आलं, मीठ, हिंग, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, किसलेलं खोबरं, तेल, मोहऱ्या (फोडणी साठी).
 
कृती
तांदुळाची चुरी 2 -3 तास पाण्यात भिजवावी. चणा डाळ देखील भिजत ठेवावी. 
सर्वप्रथम कढईत तेल गरम करुन मोहरी, आलं, मिरच्यांचे तुकडे, तांदळाची चुरी, चणा डाळ, तिखट, मीठ, हिंग, साखर, हळद, मिसळून चांगले परतावे. त्यात लागत लागत गरम पाणी घालून वाफवावे. शेंगदाणे घालून पुन्हा वाफवावे. त्यात लिंबू पिळून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं सजवून सर्व्ह करावे.