1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जुलै 2020 (22:42 IST)

Guru Purnima 2020 Wishes in Marathi गुरूपौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा

GURU PURNIMA SMS MARATHI Collection
ज्यांनी मला घडवलं
या जगात लढायला,जगायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
****************************************
 
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु
गुरुदेवो महेश्वर:
गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
****************************************
 
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
****************************************
 
गुरु हा संतकुळीचा राजा। 
गुरु हा प्राणविसावा माझा।
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
****************************************
 
आदी गुरुसी वंदावे | 
मग साधनं साधावे||
गुरु म्हणजे माय बापं | 
नाम घेता हरतील पाप|| 
गुरु म्हणजे आहे काशी | 
साती तिर्थ तया पाशी||
तुका म्हणे ऐंसे गुरु | 
चरणं त्याचे ह्रदयीं धरू||
****************************************
 
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
****************************************
 
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया|..
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई,
शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
****************************************