सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जून 2020 (12:22 IST)

गुरु हे गुळासारखेच असतात

मुंगी किती लहान, तिला मुंबई ते पुणे प्रवास करायला कदाचित 3-4 जन्म लागतील. पण तीच मुंगी पुण्याला जाणाऱ्या  माणसाच्या कपड्यावर चढली तर सहज 3-4  तासात पुण्याला पोचेल की नाही.
 
तद्वत  आपल्या प्रयत्नाने भवसागर ओलांडणे फार कठिण, कदाचित शेकडो जन्मही लागू शकतील,  त्यापेक्षा गुरुचे बोट धट्ट धरा, त्याने सांगितलेल्या मार्गावरून श्रद्धेने वाटचाल करा, बघा किती सहजपणे ते तुम्हाला सुख, समाधान व अखंड आनंदाच्या नगराकडे घेऊन जातील. 
 
एक आवडलेलं छान वाक्य आपल्यासाठी.....
गुरु हे गुळासारखेच असतात त्यांना फक्त तिळा सारखे चिकटून राहा आयुष्य गोड झाल्याशिवाय राहणार नाही...
आपण खूप नशीबवान आहोत की आपल्या आयुष्यात सद्गुरू आहेत.