Maharashtra Day Wishes In Marathi महाराष्ट्र दिनाचे शुभेच्छा संदेश
माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…
.....................................
भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
.....................................
आम्हाला अभिमान आहे
महाराष्ट्रीय असण्याचा..
आम्हाला गर्व आहे
मराठी भाषेचा..
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
.....................................
अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा…
!!!जय महाराष्ट्र!!!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
.....................................
दगड झालो तर ‘सह्याद्रीचा’ होईन!
माती झालो तर ‘महाराष्ट्राची’ होईन!
तलवार झालो तर ‘भवानी मातेची’ होईन!
आणि…
पुन्हा मानव जन्म मिळाला तर ‘मराठीच’ होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!
.....................................
महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा.
जय महाराष्ट्र...
महाराष्ट्र दिन व अंतरराष्ट्रीय कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
.....................................