रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2020 (20:53 IST)

एअर कंडीशनर वापरत आहात तर 'ही' आहेत मार्गदर्शन तत्वे

करोना व्हायरस महामारीदरम्यान घरातील एअर कंडीशनरचे तापमान 24 ते 30 डिग्री दरम्यान असावे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. घर आणि कार्यालयांमध्ये AC च्या वापराबात केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एसीच्या वापरावेळी आर्द्रता 40 ते 70 टक्के असावी, असा सल्लाही केंद्राकडून देण्यात आला आहे.
 
इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडीशनर इंजिनिअर्सने (ISHRAE) सुचवलेली ही मार्गदर्शक तत्त्वे केंद्रीय सामाजिक बांधकाम विभागाने (CPWD) जारी केली आहेत. देशातील हवामानाच्या परिस्थितीचा अभ्यास करुन ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. घरात एअर कंडीशनरचा वापर करताना खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात असेही यात सुचवण्यात आले आहे. याशिवाय, एसी वापरताना एग्जॉस्ट फॅनचा वापर करावा, एसी सुरू नसेल तरीही घरात व्हेंटिलेशन आवश्यक आहे, असे एसी वापराबाबतच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
 
कमर्शियल आणि इंडस्ट्रियल सेक्टरसाठी एसीचा वापर करताना जास्तीत जास्त व्हेंटिलेशन असावे असे देखील सुचवण्यात आले आहे. पंखा वापरतानाही खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात असे, या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे. लॉकडाउनमुळे बहुतांश कमर्शियल सेक्टर बंद आहेत. दीर्घकाळाच्या लॉकडाउनमुळे इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये AC चा वापर न झाल्यामुळे त्याचा वापर करण्याआधी मशिन व जवळपास साफसफाई करावी व एसी वापरताना आर्द्रता आणि तामपानाची काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.