शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2020 (13:29 IST)

Facebook चं नवीन व्हिडिओ फीचर Messenger Rooms, एकाचवेळी 50 जणांना करा व्हिडिओ कॉल

लॉकडाउनमध्ये झूम अॅप प्रचंड लोकप्रिय झाला आहे त्यामुळे आता त्याला टक्कर देण्यासाठी फेसबुकने नवीन फीचर आणलं आहे. फेसबुकने एक नवीन व्हिडिओ चॅटिंग फीचर ‘Messenger Rooms’ लॉच केले आहे यात एकाचवेळी 50 जणांना व्हिडिओ कॉल करता येणे शक्य आहे.
 
या फीचरद्वारे युजर्स स्वतः चॅट रूम्स तयार करु शकतील. मेसेंजर रुम्स हे फीचर फेसबुकच्या मेसेंजरमध्ये मिळेल. विशेष म्हणजे फेसबुक अकाउंट नसलं तरी युजरव्हिडिओ चॅटिंग रुम जॉइन करु शकतील. या वेळीची मर्यादा नसणार. यावर नियंत्रण मेसेंजर रुम होस्ट करणार्‍याकडे असेल. आणि होस्ट युजर रुम लॉक किंवा अनलॉक करु शकेल.
 
होस्टकडे युजर्सला ज्वाइन करण्याचा तसेच बाहेर काढण्याचा पर्याय असेल. ज्याप्रमाणे फेसबुक मेसेंजरवर ग्रुप बनवला जातो, त्याचप्रमाणे Messenger Rooms क्रिएट करता येईल. 24 एप्रिलपासून Messenger Rooms हे फीचर कंपनीने रोलआउट करण्यास सुरूवात केली असून काही दिवसांमध्ये सर्व युजर्सना हे फीचर उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे यात एकाचवेळी 50 लोक जुळू शकतील.