रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2020 (12:37 IST)

मानव प्राणी संघर्षात 21 जणांचा मृत्यू

लॉकडाऊनच्या काळात मानव-प्राणी संघर्षात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
Wildlife Institute of India या संस्थेनं लॉकडाऊनच्या काळातील मानव-प्राणी संघर्षावर अभ्यास करण्यासाठी Lockdown Wildlife Tracker नावाचं एक अप तयार केलं आहे.
 
या 21 मृत्यूंपैकी 13 मध्यप्रदेशातील आहेत, तर विदर्भात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या 8 पैकी 7 मृत्यू गेल्या 15 दिवसांतील आहे.