1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 एप्रिल 2020 (21:52 IST)

'म्हणून' सलीम खान यांना मॉर्निंग वॉकला जाण्याची परवानगी

morning walk
लॉकडाउन असतांना बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडिल सलीम खान यांना मॉर्निंग वॉकला जाण्याची परवानगी कोणी दिली असा प्रश्न विचारला जात होता. आता खुद्द सलीम यांनी याचा खुलासा केला आहे.
 
‘डॉक्टरांनीच मला दररोज चालण्याचा सल्ला दिला आहे आणि त्यासाठी मी सरकारकडून पास देखील घेतला आहे’ असे सलीम यांनी म्हटले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सलीम खान वांद्रे येथे पक्षांना दाणे टाकत आहेत. आताच्या कठिण परिस्थितीमध्ये त्या पक्षांची काळजी आपणच घ्यायला हवी असे त्यांनी म्हटले आहे.