मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Modified: सोमवार, 12 एप्रिल 2021 (20:12 IST)

गुढीपाडव्या खातात कडुलिंबाची पाने, त्याचे फायदे जाणून घ्या

हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही पद्धत आहे. तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेल्या प्रसादाचे सेवन केलं जातं. यामागील नक्की कारण काय-
 
तसं तर कडुनिंबाची कोवळी पाने दररोज खाल्ली पाहिजे परंतू नववर्ष आरोग्यादायी जावं म्हणून वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी याचे सेवन केले जाते. कडुलिंब खाल्लयाने रोगराई दूर होते आणि शरीर निरोगी राहतं.
 
या झाडाच्या पाचही अंगाचे खूप महत्त्व आहे. कडुलिंबाचे मूळ, कडुलिंबाच्या झाडाची साल, पाने, फ्लॉवर आणि कडुलिंब बियाणे. याचे फायदे जाणून घ्या- 
ताप येत असल्यास कडुलिंबींची पाने चघळ्याने ताप झटक्यात कमी होतो.
याने मन शांत आणि शरीर मजबूत राहतं.
पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल्स आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात. म्हणून दररोज दोन पाने खाल्ल्याने आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीवर चांगले परिणाम दिसून येतात.
लिंबाची पाने खाल्ल्याने अल्सर आणि सूज येणे तसंच आतड्यांसंबंधी विकारांपासून आराम मिळतो.
याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीश्या होतात.
अंघोळीच्या पाण्यात निंबोळी पाने घालून स्नान केल्याने खाज येण्याची समस्या दूर होते.
उन्हाळ्यात कडूलिंबाची पाने सेवन केल्याने त्वचेवरील मुरूम बरे होण्यास मद‍त मिळते.
 
कडुलिंबाचा प्रसाद
कडुलिंबाची पाने, भिजलेली चण्याची डाळ, जिरे, हिंग आणि मध हे सर्व मिसळून प्रसाद तयार होतो. किंवा ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून देखील खाऊ शकता.