शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मार्च 2020 (09:46 IST)

MPSC च्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित

करोना या साथीच्या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठीच्या Epidemic Act,1897 या कायद्याची अमलबजावणी राज्यात करण्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर राज्यातील MPSC च्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्यात आल्या आहेत.
 
राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी तसे पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठवले आहे. त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, “राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेली आहे.”
 
त्यामुळे आता ३१ मार्चपर्यंत कोणत्याही प्रकारची एमपीएससी परीक्षा घेतली जाणार नाही. अशाच आशयाचे टि्वटही राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही केले आहे.