1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified शनिवार, 11 एप्रिल 2020 (09:02 IST)

पुणे महानगरपालिका करोनाशी सामना करण्यासाठी मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ कोटी रूपयांचे विमा कवच

पुणे महानगरपालिका करोनाशी सामना करण्यासाठी मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ कोटी रूपयांचे विमा कवच देणार आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली.“प्रत्येक पातळीवर आज सर्वजण काम करता आहेत. पालिकेतील वर्ग एक ते वर्ग चार वर्गातील सर्वच कर्मचारी करोनाविरुद्ध लढत आहेत. हे सर्वजण आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. या सर्वांना आम्ही सुरक्षा कवच देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यांचा आत्मविश्वास जपण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू,” असं महापौरांनी स्पष्ट केलं आहे. 
 
या कालावधीत कोणत्याही अधिकाऱ्याचं मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीपैकी एकाला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. जर पालिकेच्या सेवेत त्यांना येण्याची इच्छा नसेल तर त्यांना १ कोटी रूपये देण्यात येतील. अन्यथा ७५ लाख रूपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेच्या नोकरीत सामावून घेतलं जाईल,” असं महापौरांनी स्पष्ट केलं.